मारिया सुसाईराजला अटकपूर्व जामीन फेटाळला

15 कोटींच्या आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल

मुंबई, (प्रतिनिधी) : कोट्यावधी रुपयाच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी दाक्षिणात्य अभिनेत्री आणि मुंबईत गाजलेल्या नीरज ग्रोव्हर हत्याकांडातील प्रमुख आरोपी मारिया सुसाईराजला मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला. नीरज ग्रोव्हर हत्या प्रकरणी तीन वर्षाची शिक्षा झालेल्या मारियाने शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर आपल्या साथीदारांच्या मदतीने वेगवेगळी आमिष देऊन ठाण्यातील छोटे मोठे उद्योगपती, व्यावसायिकांभोवती जाळे टाकण्यास सुरूवात केली. ठाणे पोलीसांनी या प्रकरणी सुमारे 15 कोटी रूपयांच्या आर्थीक घोटाळ्याप्रकरणी मारीयासह अन्य नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. चौघाजणांना अटकही केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या प्रकरणी अटकेची शक्‍यता निर्माण झाल्याने मारीयाने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनसाठी अर्ज दाखल केला.
या अर्जावर न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या समोर आज सुनावणी झाली. न्यायालयाने मारीयाला यापूर्वी 1 कोटी रूपये
अनामत रक्कम जमा करण्याचे निर्देश दिले होते. मात्र ही रक्कम जमा न केल्याने अखेर न्याय्यालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)