मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांना मासळीविक्रीसाठी फिरते वाहन 

संग्रहित छायाचित्र

– 2 कोटी 64 लाखांचा निधी मंजूर 

मुंबई –
सततचा दुष्काळ, अवकाळी पाऊस आदी नैसर्गिक संकटामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना शेतीबरोबरच पुरक जोडधंदा करता यावा यासाठी मराठवाडा व विदर्भातील जिल्हयातील शेतकऱ्यांना मासळी विक्रीसाठी फिरते वाहन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी 2 कोटी 64 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

राज्यात गेल्या 3 ते 4 वर्षांत गारपीट, अवकाळी पाऊस आदी नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकार विविध उपाययोजना करत आहे. कर्जमाफीसोबतच हा शेतकरी स्वतःच्या पायावर उभा रहावा यासाठी देखील सरकार विविध माध्यमांतून मदत करत आहे.मराठवाडा तसेच विदर्भातील निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मासळी विक्रीसाठी फिरते वाहन देण्याचा निर्णय त्यासाठीच घेण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याआधी 100 टक्के अर्थसहायाने फिरते मासळीविक्री वाहन देण्यात येणार होते. मात्र त्यापैकी 40 टक्के अनुदान राष्ट्रीय मस्त्यिकी विकास मंडळाकडून प्राप्त होणार होते, पण ते न मिळाल्याने ही योजना प्रत्यक्षात येउ शकली नव्हती. आता 90 टक्के राज्य शासन व 10 टक्के लाभार्थी असा हिस्सा ठरवून ही योजना प्रत्यक्षात येणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती यासाठीच्या शेतकरी गटाची निवड करणार आहे. प्रत्येक गटाला गावातल्या मच्छीमार संस्थेत सभासद म्हणून समाविष्ट करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)