प्रियांकांच्या टीममध्ये मराठी चेहरा : कोल्हापूरचे बाजीराव खाडे कॉंग्रेसच्या उत्तर प्रदेशच्या सचिवपदी

कोल्हापूर – कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या टीममध्ये मराठी चेहरा असलेले कोल्हापूरचे बाजीराव खाडे यांचा समावेश करण्यात आला आहे. कॉंग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते असणाऱ्या बाजीराव खाडे यांना कॉंग्रेसच्या उत्तर प्रदेश (पूर्व) सचिव पदाची जबाबदारी दिली आहे. प्रियांका गांधी यांची अखिल भारतीय कॉंग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड झाल्यानंतर त्यांच्याकडे उत्तर प्रदेशच्या पूर्व विभागाची जबाबदारी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोपवली. त्यानंतर आता प्रियंका गांधी यांच्या टीममध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आहे.

माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातील कार्यकर्त्याला पक्षाने दिलेली ही मोठी जबाबदारी आहे. दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणार असून पक्षाची ध्येय, धोरणे आणि विचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन कॉंग्रेसच्या उत्तर प्रदेश पूर्व सचिवपदी नेमणूक झालेले बाजीराव खाडे यांनी व्यक्त केले आहे. निवडीनंतर त्यांचा येथील कॉंग्रेस कमिटी कार्यालयात जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बाजीराव खाडे हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील सांगरूळ गावचे रहिवाशी आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसकडून जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देण्यात येत आहे. खाडे हे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांनी कॉंग्रेसच्या पंचायतराज समितीवर राष्ट्रीय सरचिटणीस पदी काम केले आहे. तेलंगणाचेही ते प्रभारी आहेत.
गेल्या महिन्यात त्यांची कॉंग्रेसच्या जाहीरनामा प्रदेश समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. अशातच त्यांना आता ही मोठी जबाबदारी मिळाली आहे. त्यांच्या या निवडीनंतर कोल्हापूर येथील कॉंग्रेस कमिटी कार्यालयात जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)