“सिम्बा’मध्ये मराठी कलाकारांची पलटण

दिग्दर्शक रोहित शेट्टी कायमच ऍक्‍शन आणि ड्रामाने परिपूर्ण असलेल्या चित्रपटांची निर्मित करत असतो. त्याचे हे चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर चांगले गाजतातही. त्यांचा असाच एक पैसा वसूल करणारा ‘सिम्बा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच नुकताच ट्रेलर रिलीज झाला आहे. “सिम्बा’मध्ये रणवीर झळकणार असल्यामुळे सुरुवातीपासूनच त्याविषयी चाहत्यांमध्ये चर्चा पाहायला मिळाली होती आणि आज अखेर त्या चित्रपटाची एक मोठी झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली.

या चित्रपटातील रणवीरचा अंदाज प्रेक्षकांची मने जिंकतोय खरा. पण, त्यासोबतच आणखी एक गोष्ट सर्वांचच लक्ष वेधत आहे. ती म्हणजे मराठी कलाकारांचा सहभाग. सिद्धार्थ जाधव, सुचित्रा बांदेकर, अरुण नलावडे असे मराठी कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसत आहेत. मुख्य म्हणजे इतरही बरेच चेहरे रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात पाहायला मिळत आहेत, त्यामुळे ही मराठी रसिकांसाठी पर्वणीच आहे. हे सगळे मराठी कलाकार “सिम्बा’मध्ये कोणकोणत्या भूमिका करणार आहेत, हे मात्र अद्याप समजले नाही. पण कथेमध्ये त्यांच्या वाट्याला आलेला रोल ते उत्तम साकारतील याची खात्री आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)