मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंतची बॉलिवूडमध्ये एन्ट्री

बॉलीवूडमध्ये अनेक मराठमोळ्या नायिकांनी आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. त्यानंतर आता आणखी एक मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. अभिनेता विद्युत जामवालसोबत “जंगली’ चित्रपटातून पूजा हिंदी चित्रपटसृष्टीत पाउल ठेवत आहे.

“जंगली’ चित्रपटाचा टीझर काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला होता. मात्र त्यात पूजाची झलक न दिसल्यामुळे चाहत्यांमध्ये तिच्या लूकबाबत उत्सुकता होती. चक रसेल यांच्याकडे चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा आहे. पूजा सावंतने 2008मध्ये “मटा श्रावणक्वीन’ ही स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर 2010 मध्ये पूजाने “क्षणभर विश्रांती’ चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर पोष्टर बॉईज, नीळकंठ मास्टर, दगडी चाळ, भेटली तू पुन्हा अशा अनेक चित्रपटांमध्ये ती झळकली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पूजा “एकापेक्षा एक जोडीचा मामला’ या रिऍलिटी शोमध्ये वैभव तत्त्ववादीसोबत झळकली होती. तर “जल्लोष सुवर्णयुगाचा’ या स्पर्धेची ती विजेतीही ठरली होती.

दरम्यान, अमृता खानविलकर, सई ताम्हणकर, वैभव तत्त्ववादी, सिद्धार्थ जाधव, सौरभ आणि अनुजा गोखले यासारखे मराठी सिनेविश्व गाजवणारे अनेक कलाकार बॉलिवूडमध्ये झळकले आहेत. पूजाच्या रुपाने आणखी एक नाव हिंदी पडदा व्यापून टाकण्यास सज्ज झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)