’83’ सिनेमात ‘हा’ मराठमोळा अभिनेता साकारणार दिलीप वेंगसकर यांची भूमिका

निर्माता-दिग्दर्शक कबीर खान यांचा 1983मधील विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकणा-या भारतीय संघावर आधारित “83’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रणवीर सिंग या सिनेमामध्ये भारतीय संघांचे माजी कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारत आहे.

काही दिवसापूर्वीच चिराग पाटील हा आपल्याच वडिलांची म्हणजे क्रिकेटपटू संदीप पाटील यांची भूमिका साकारणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. चिराग पाटील यांच्यानंतर या चित्रपटात आणखी एक मराठमोळा चेहरा झळकणार आहे.

मराठी अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता आदिनाथ कोठारे या सिनेमात दिलीप वेंगसकर यांची महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारणार आहे. ’83’मध्ये दिलीप वेंगसकरांची भूमिका साकारणार असल्याची माहिती स्वतः आदिनाथ याने ट्विटर वरुन दिली आहे. आदिनाथ लवकरच या सिनेमाचं शूटिंग सुरू करणार असून याबाबत तो खूपच उत्सुक असल्याचं त्यानं आपल्या ट्विटर पोस्टमध्ये म्हटलं आहे.

कर्णधार कपील देवची भूमिका साकारणा-या रणवीरचा संघ जवळपास निश्‍चित झाला आहे. या संघाचे प्रशिक्षक म्हणून पंकज त्रिपाठी याची तर सुनील गावस्करच्या भूमिकेत ताहिर राज भसीन झळकणार आहे. तसेच भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची भूमिका दक्षिण स्टार जीवा साकारणार आहे. यापूर्वी पंजाबी स्टार एमी विर्क याला बलविंदर सिंह संधू यांची भूमिका साकारण्यासाठी निश्‍चित करण्यात आले होते.

भारतीय क्रिकेट टीमचे तत्कालिन कर्णधार कपिल देव यांची कन्या अमिया ही या सिनेमासाठी असिस्टंट डायरेक्‍टर म्हणून काम करणार आहे.असिस्टंट डायरेक्‍टर म्हणून तिचा हा पहिलाच सिनेमा असणार आहे. सिनेमाच्या शुटिंग दरम्यान ती डायरेक्‍टर कबीर खान यांना सहकार्य करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)