#MarathaReservation मराठा समाजातील ९३% लोकांचे वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा कमी : आयोग

संग्रहित छायाचित्र

मुंबई : राज्य मागासवर्ग आयोगाने सादर केलेल्या अहवालावरून आज राज्य सरकारने मराठा समाजाला १६% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. राज्य मागासवर्ग आयोगाने तयार केलेल्या या अहवालामध्ये मराठा समाजाच्या बिकट परिस्थितीवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

आयोगाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार :

-Ads-

१) राज्यातील जवळपास ३७.२८% मराठा समाज हा दारिद्रय रेषेखाली आहे.

२) राज्यातील ९३% मराठा समाजाचे वार्षिक उत्पन्न १ लाखांपेक्षा कमी आहे.

३) २०१३ ते २०१८ दरम्यान मराठा समाजातील एकूण २१५२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.

४) भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये (IAS) केवळ ६.९२% अधिकारी मराठा समाजाचे आहेत. यापैकी केवळ ०.२७% अधिकाऱ्यांची निवड थेट भर्तीद्वारे झाली आहे.

५) भारतीय पोलिस सेवेत १५.९२% तर भारतीय वन सेवेत मराठा समाजाला ७.८७% स्थान आहे.

६)  ‘उच्च, तांत्रिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये मराठा समाजाचे अल्प प्रतिनिधित्व सामाजिक अक्षमता, अयोग्य आर्थिक परिस्थिती आणि शैक्षणिक कमकुवतता दर्शवते’ असे राज्य मागास आयोगाने आपल्या निष्कर्षांमध्ये नमूद केले आहे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)