#MarathaReservation मराठा आरक्षण दिल नाही…मराठा समाजाने ते मिळवल!- राणे

मुंबई: “मराठा आरक्षण दिल नाही.. मराठा समाजाने ते मिळवल! ५८ मोर्चे.. १४६०० मुलांनी पोलीस केसेस घेतल्या.. ४२ लोकांनी बलिदान दिले!! शेवटी राणे समितीचा अव्हाल नाव बदलून स्वीकारायला लागलेच! अखेर सरकारला मराठा समाजाच्या समोर झुकावच लागल! एक मराठा लाख मराठा”, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी सेवेत आरक्षण देणारे मराठा आरक्षणाचा कृती अहवाल(एटीआर) आज विधिमंडळात एकमताने मंजूर करण्यात आला आहे. या अहवालातून मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यात आले.

-Ads-

मराठा समाज आरक्षण  विधेयक 2018 या विधेयकास विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसकडून एकमताने मंजूरी दिली आहे. त्यानंतर, अजित पवार यांनीही या विधेयकास एकमताने मंजूरी देत पाठिंबा देत असल्याचं म्हटले आहे. या विधेयकात मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्यात. मराठा समाजाचा SEBC प्रवर्गात समावेश करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)