#MarathaReservation भाजप-सेनेने फेटे बांधून जल्लोष करणे कितपत योग्य ? :विश्वजित कदम

मुंबई:  मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी सेवेत आरक्षण देणारे मराठा आरक्षणाचा कृती अहवाल(एटीआर) आज विधिमंडळात एकमताने मंजूर करण्यात आला आहे. या अहवालातून मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यात आले.

मराठा समाज आरक्षण  विधेयक 2018 या विधेयकास विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसकडून एकमताने मंजूरी दिली आहे. त्यानंतर, अजित पवार यांनीही या विधेयकास एकमताने मंजूरी देत पाठिंबा देत असल्याचं म्हटले आहे. या विधेयकात मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्यात. मराठा समाजाचा SEBC प्रवर्गात समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान,  भाजप व शिवसेनेच्या आमदारांनी भगवे फेटे घालून विधानभवनात जल्लोष केला तसेच फडणवीसांच्या नावाच्या घोषणा दिल्या. यावर अनेक नेत्यांनी टीका केली आहे. मराठा आरक्षणाच्या निणयाचे स्वागत, पण ४० हुतात्मे झाल्यानंतर भाजप-सेनेने फेटे बांधून जल्लोष करणे कितपत योग्य ? असा प्रश्न काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी उपस्थित केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
0 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
3 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)