मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार : विधिमंडळात आज विधेयक मांडणार

मुंबई:  मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलने, मुक मोर्चे, उपोषणे आदी माध्यमातून सकल मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या लढ्याला आता खछया अर्थाने न्याय मिळणार आहे. मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी सेवेत आरक्षण देणारे बहुचर्चित विधेयक उद्या (गुरूवार) विधिमंडळात मांडले जाणार आहे. राज्य मागसवर्ग आयोगाच्या अहवालातील प्रमुख शिफारशी आणि त्यावर सरकारने केलेल्या कार्यवाहीची माहिती देणारा कृती अहवाल (एटीआर) सादर केला जाणार असल्याने मराठा आरक्षणाचा तिढा आता कायमचा सुटणार आहे. मात्र, हे आरक्षण देताना किती टक्के देणार याकडेही अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यभरात वातावरण तापलेले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी नेमण्यात आलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर करावा, अशी मागणी करीत विरोधकांनी विधानसभा व विधानपरिषदेचे कामकाज रोखून धरले होते. मराठा समाजाला तातडीने आरक्षण लागू करा, यासाठी मराठा समाजाच्या कार्यकत्र्यांनी निर्णायक भूमिका घेत आझाद मैदानात उपोषण सुरु केले आहे. तसेच आरक्षणासाठी आतापर्यत 40 जणांनी आत्मबलिदान केले आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण दिले जाईल असे सांगून 1 डिसेंबरला जल्लोष करण्याचे आवाहन केले आहे.

हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजण्यास दोन दिवस शिल्लक असताना सरकारकडून उद्याच मराठा आरक्षणाचे विधेयक मांडले जाण्याची दाट शक्‍यता आहे. विधेयकात मराठा समाजासाठी 16 टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल विधिमंडळात सादर करावा, ही विरोधी पक्षाची मागणी सरकारने फेटाळली आहे. आयोगाचा अहवाल विधिमंडळाला सादर करणे सरकारला बंधनकारक आहे की नाही यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षात मतभेद आहेत.

अहवाल मांडल्यास मराठा आरक्षणाला फाटे फुटण्याची शक्‍यता असल्याने सरकारकडून थेट विधेयक मांडले जाईल. मराठा आरक्षणावर सर्वच पक्षांचे एकमत असल्याने विधेयकावर फारशी चर्चा न होता ते मंजूर होण्याची शक्‍यता आहे. विधानसभा आणि विधानपरिषदेत एकाच दिवशी विधेयक मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आरक्षण विधेयक मंजूर होण्यात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेने आपल्या आमदारांना याआधीच व्हीप बजावला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)