मराठा आरक्षण शिवसेनेमुळेच लांबले : नितेश राणे

कोल्हापूर: मराठा आरक्षणाचे श्रेय नारायण राणे यांना मिळू नये म्हणून सेनेने चार वर्षे आडकाठी केली. मराठा समाजाचे आरक्षण शिवसेनेमुळे लांबले असल्याचा आरोप स्वाभिमान संघटनेचे नेते आमदार नितेश राणे यांनी केला आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.

आमदार नितेश राणे हे खासगी कार्यक्रमासाठी कोल्हापूरला आले होते. यावेळी कोल्हापूरच्या स्वाभिमान पक्षाच्या कार्यालयाला भेट दिली. यानंतर माध्यमांशी बोलतांना नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली. आर्थिक निकषावर आरक्षण हाच मुद्दा उपस्थित करत सेनेने मराठा आरक्षणाला विरोध केला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

-Ads-

गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी नारायण राणे यांच्या कणकवली इथल्या निवासस्थानी भेट घेतली. यानंतर सुरू झालेल्या राजकीय चर्चेला राणे यांनी पूर्ण विराम देत राष्ट्रवादी पक्ष एवढा मोठा नसून राष्ट्रवादीतील अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे स्वाभिमान पक्ष आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे राणे यांनी म्हटले आहे. गेल्या 2 दिवसांपूर्वी कणकवलीत राडा झाला होता. या राड्या प्रकरणी नितेश राणे यांनी “नो कमेंट्‌स’ असे उत्तर दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)