मराठा आरक्षण ही सरकारची “कमिटमेंट’ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आरक्षणावरून दोन समाजात तेढ करण्याचा विरोधकांचा डाव 

मुंबई: मराठा समाजाला आरक्षण देणार ही सरकारची “कमिटमेंट’ आहे. मात्र, विरोधकांच्या मनातच काळेबेरे, खोट आहे. आरक्षणाच्या नावाखाली त्यांचा दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा डाव आहे. मुस्लिम समाजाकडे ते केवळ व्होटबॅंक म्हणून बघतात, अशा शब्दांत फटकारतानाच विरोधी पक्षांनी यावर राजकारण करू नये, अशी हात जोडून विनंती करतो. पण राजकारण करणारच असाल तर आम्हालाही राजकीय उत्तर देता येते हे लक्षात ठेवा, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विरोधकांना दिला आहे.

-Ads-

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून मराठा आरक्षणाच्या मुद्‌द्‌यावरून विरोधकांचा विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात गोंधळ सुरु आहे. पहिल्या आठवड्यात सभागृहाचे कामकाज तीन दिवस तहकूब करावे लागल्यानंतर विरोधकांनी आजही मराठा आरक्षणाचा अहवाल सभागृहासमोर मांडा अशी मागणी करीत गोंधळ केला. सभागृहाचे कामकाज चार वेळा तहकूब झाल्यानंतर प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

राज्य मागासवर्ग आयोगाचा हा 52वा अहवाल आहे. याआधीचे 51 अहवाल कधीच सभागृहात मांडण्यात आले नसल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात 52 टक्के आरक्षण आहे. ओबीसी तसेच इतर आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात येणार आहे. याच अधिवेशनात मराठा आरक्षणासाठीचा कायदा करणारे विधेयक मांडण्यात येईल. त्या आधी कृती अहवाल (एटीआर) देखील मांडण्यात येणार आहे.
मुस्लिमांचा व्होटबॅंक म्हणून वापर!

कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडी सरकारने मुस्लिम समाजाला आरक्षण दिलेले नाही. मुुस्लिम समाजातील 52 मागास जातींना याआधीच युतीच्या सरकारमध्ये आरक्षण देण्यात आले आहे. मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यांना उच्च व तंत्रशिक्षणात तुमच्या सरकारने शिष्यवृत्ती दिली नाही, ती आमच्या सरकारने दिली. आमचे सरकार मुस्लिम समाजाच्या पाठिशी असून विरोधक केवळ मुस्लिमांचा व्होटबॅंक म्हणून वापर करीत आहेत, असा संताप मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. तुमच्या काळात सच्चर आणि रंगनाथन समितीचा अहवाल आला तेव्हा का नाही आरक्षण दिले, असा सवालही त्यांनी केला.

धनगरांच्या आरक्षणाच्या शिफारशी केंद्राला पाठवणार 
धनगर समाजाविषयीची भूमिका सरकारने याआधीच स्पष्ट केली आहे. धनगर समाजाच्या अहवालाविषयीचा कृती अहवालही सभागृहसमोर ठेवला जाईल. त्यावर अभ्यास सुरू आहे. तो निश्‍चित कालावधीत पूर्ण करून त्याबाबतचाही एटीआर योग्यवेळी या सभागृहात मांडण्यात येईल, असे सांगतानाच आदिवासी समाजाला मिळत असलेल्या सवलतीत कुठेही वाटेकरी न करता धनगर समाजाला आरक्षण देण्याविषयीच्या शिफारशी केंद्राला पाठविणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)