मराठा आरक्षण पुन्हा न्यायालयाच्या कचाट्यात?

आक्षरणाविरोधात हायकोर्टात जनहित याचिका

आक्षरण घटनाबाह्य असल्याचा दावा

-Ads-

मुंबई: दोन वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर राज्य सरकारने कायद्यात दुरूस्ती करून मराठा समाजाला दिलेले आरक्षण घटनाबाह्य आहे, असा दावा करून आरक्षणाच्या वैधतेलाच आव्हान देणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. जयश्री पाटील यांच्यावतीने ऍड. गुणरत्न सदावर्ते यांनी ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर बुधवारी मुख्य न्या. नरेश पाटील आणि न्या, संदीप शिंदे यांच्या पीठासमोर सुनावणी होण्याची शक्‍यता आहे. राज्य सरकारने कायद्यात केलेल्या दुरूस्तीला आव्हान दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणासंदर्भात यापूर्वी दिलेल्या निवाड्यानुसार राज्य सरकारने 50 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक आरक्षण देणे घटनाबाह्य असल्याने आरक्षण रद्द करावे अशी

मागणी याचिकेत केली आहे. तसेच सामाजिकदृष्ट्या अपंग असलेल्यांना आरक्षण मिळणे क्रमप्राप्त आहे. यामध्ये गावकुसाबाहेर राहणारे, गुराढोरांची कामे करणारे, नाचकाम करणाऱ्या महिला आदी घटकांसाठी आरक्षण असायला हवे. मराठा समाज या कक्षेत येऊ शकत नाही, त्यामुळे त्यांना आरक्षण देता येणार नाही, असेही त्यांनी याचिकेत म्हटले आहे. राज्य सरकारने मंजूर केलेला मराठा आरक्षणाचा कायदा मागे घ्यावा आणि संविधानिक तरतूद कायम ठेवावी, अशी मागणी ही याचिकेत केली आहे. या याचिकेवर बुधवार दि. 5 डिसेंबर रोजी सुनावणी होण्याची शक्‍यता आहे.

सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल
या याचिकेमुळे मराठा आरक्षण पुन्हा न्यायालयीने कचाट्यात सापडण्याची शक्‍यता आहे. राज्य सरकारला मराठा आरक्षणासाठी पुन्हा न्यायालयीन लढाई लढावी लागणार आहे. दरम्यान मराठा अरक्षणाविरोधात याचिकादाखल होण्याची शक्‍यता असल्याने यापूर्वी सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील मुंबई उच्च न्यायालयात तर राजेंद्र दाते पाटील यांनी मुंबई आणि औरंगाबाद खंडपीठाकडे आणि राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. त्यामुळे यांची बाजू ऐकून घेतल्याशिवाय न्यायालय या याचिकेवर एकतर्फी निर्णय देण्याची शक्‍यता नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)