मराठा आरक्षण कायदा राज्यात लागू 

संग्रहित छायाचित्र

राजपत्रात (गॅझेट) अधिनियम प्रकाशित झाला 

मुंबई: मराठा समाजाला आरक्षण देणारे विधेयक 29 नोव्हेंबर रोजी विधिमंडळात मंजूर झाल्यानंतर शुक्रवारी या विधेयकावर राज्यपालांची मोहर उमटताच या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले. राज्यपाल सी.विदयासागर राव यांनी या विधेयकावर स्वाक्षरी केल्यानंतर शनिवार 1 डिसेंबर रोजी महाराष्ट्र शासन राजपत्रात (गॅझेट) हा अधिनियम प्रकाशित झाला आहे. यामुळे आता सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली असून त्याचे आता कायद्यात रुपांतर झाले आहे.

-Ads-

मराठा आरक्षण विधेयक हिवाळी अधिवेशनातच मंजूर करणार तसेच मराठा तरूणांनी 1 डिसेंबरला जल्लोष करावा, असे “कमिटमेंट’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यानुसार मराठा आरक्षणाच्या विधेयकाला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजुरी देण्यात आली होती. या विधेयकावर कोणतीही चर्चा न होता मंजूर केल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षाच्याआमदारांचे आभार मानले होते. मात्र कोणताही कायदा प्रत्यक्ष अंमलात येण्यासाठी विधिमंडळाची मंजुरी आणि राज्यपालांची स्वाक्षरी झाल्यानंतर तो शासनाच्या राजपत्रात प्रकाशित होणे आवश्‍यक असते. ती प्रक्रिया शनिवारी पार पाडण्यात आली. शासन राजपत्रात आता हा अधिनियम प्रकाशित झाल्याने कायदा प्रत्यक्षात आला आहे.

मराठा समाजाला शिक्षण आणि शासकीय नोक-यांत 16 टक्‍के आरक्षण देण्याची तरतूद या कायद्यात आहे. 72 हजारांची मेगाभरती मराठा आरक्षणामुळे थांबविण्यात आली होती. अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही भरती आता तात्काळ सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता मराठा तरूणांना या भरतीत आरक्षण मिळणार आहे. तसेच शिक्षकांची पदे देखील भरण्यात येणार आहेत. या भरतीत देखील मराठा तरूणांना आरक्षण मिळणार आहे. महाराष्ट्रात आरक्षणाची मर्यादा आता 68 टक्‍क्‍यांवर गेली आहे. तामिळनाडू नंतर एवढे आरक्षण देणारे महाराष्ट्र हे दुसरे राज्य ठरले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)