मंचरमध्ये जिजाऊ वंदनेने मराठा मोर्चाला सुरुवात 

मंचर: 9 ऑगस्ट या क्रांती दिनी आंबेगाव तालुका बंद ठेवून जनआंदोलनाचा निर्णय मराठा समाजाने घेतला आहे. शाळा, शासकीय कार्यालये आणि व्यावसायिक दुकानदार यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला असून, बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले, अशी माहिती संयोजक समन्वयक राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे राज्य संस्थापक अध्यक्ष ऍड. सुनील बांगर यांनी दिली.

गुरुवारी (दि. 9) मराठा क्रांती मोर्चाची सकाळी साडेदहा वाजता मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून जिजाऊ वंदनेने सुरुवात होईल. मोर्चाच्या अग्रभागी छत्रपती शिवाजी महाराजांचे, जिजाऊसाहेब आणि मावळ्यांची वेषभुषा परिधान केलेले देखावे आणि त्यानंतर विद्यार्थी-विद्यार्थिनी, महिला आणि त्यानंतर नागरिक या क्रमाने सामिल होऊन रॅली लक्ष्मी रस्त्याने छत्रपती शिवाजी चौकात येवून ऍड. सुनील बांगर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजाचे पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यानंतर रॅली घोडेगाव रस्त्याने बाजारपेठमार्गे छत्रपती संभाजी चौकातून छत्रपती शिवाजी चौकात दिवसभर ठिय्या मांडतील. मोर्चे कऱ्यांच्यासमोर शाहीर पवार, टेमकर, थोरात यांचे शिवशाहीरीचे कार्यक्रम होतील. मोर्च्यांची सांगता विद्यार्थिनींची भाषणे आजण मराठा क्रांती मोर्चाचे प्रमुख संयोजक ऍड. सुनील बांगर यांचे संदेशात्मक मार्गदर्शन होईल.

यानंतर शासनाचे प्रतिनिधी म्हणून उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येईल. मोर्चा शांततेने होणार असून यामध्ये सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. तसेच घोडेगाव बार असोशिएशनने मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवला असल्याचे असोशिएशनचे अध्यक्ष सुरेश टाके, उपाध्यक्ष मुकुंद वळसे पाटील, अनिल पोखरकर आणि सचिव नीलेश शेळके यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)