मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजीव भोर लोकसभा निवडणुकीच्या मैदानात

अहमदनगर – मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजीव भोर हे लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय संजीव भोर यांनी घेतला आहे. भोर यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेत सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारा नेता जनतेला हवा आहे आणि तो आपण असल्याचे म्हंटले आहे. सामान्य वर्ग, कष्टकरी आणि शेतकरी अशा लोकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मी पुढे येऊन लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे संजीव भोर म्हणाले. यावेळी त्यांनी संग्राम जगताप आणि सुजय विखे पाटील यांच्यावर निशाणा साधत प्रस्थापित, धनदांडगे असल्याचे म्हंटले.

तत्पूर्वी मराठा समाजातील काही जणांनी राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली होती. या राजकीय पक्षाशी मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने देण्यात आले होते. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजीव भोर यांनी घेतलेल्या या निर्णयाला मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाचे इत्तर सदस्य काय प्रतिसाद देणार हे महत्वाचे ठरणार आहे.

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजीव भोर तसेच युती कडून डॉ सुजय विखे-पाटील आणि आघाडी कडून उमेदवार असलेले संग्राम जगताप यांच्यात अहमदनर लोकसभा निवडणुकीत तिहेरी लढत पहायला मिळणार असल्याचे चित्र आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)