मराठा आरक्षण : माहिती संकलन मुदत संपली

पुणे – मराठा आरक्षणाबाबत नेमण्यात आलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाने निवेदने आणि अर्ज स्वीकारणे; तसेच जनसुनावणीच्या माध्यमातून माहिती संकलित केली असून, माहिती संकलित करण्याची मुदत मंगळवारी (दि.31 जुलै) संपली. आता या माहितीचे विश्‍लेषण करून याबाबतचा अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्यात येणार आहे.

आयोगाने मराठा आरक्षणाबाबत गेल्या दोन महिन्यांत जनसुनावणी घेतल्या; तसेच सामाजिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था आणि वैयक्तिक अर्ज स्वीकारले. दि.31 जुलैपर्यंत माहिती संकलित करण्यात येणार असल्याची माहिती आयोगाने उच्च न्यायालयात दिली होती. त्यानुसार ही मुदत मंगळवारी संपली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आयोगाचे कार्यालय पुण्यात असून, संकलित करण्यात आलेल्या माहितीचे विश्‍लेषण करण्याचे कामकाज सुरू आहे. लवकरच याबाबतचा अहवाल तयार होणार आहे. निवृत्त न्यायाधीश एम. जी. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोगाचे कामकाज सुरू आहे. आयोगाकडे राज्यभरातून निवेदने आली आहेत. पुण्यातून सुमारे 26 हजार निवेदने आणि अर्ज आले आहेत. निवेदनासोबतच लेखी पुरावा, ऐतिहासिक दस्तावेज आणि वैयक्तिक अनुभव अशाप्रकारची माहिती संकलित करण्यात आली आहे. या माहितीचे विश्‍लेषण करण्याचे काम सध्या सुरू असल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले.

जनसुनावणीमध्ये मराठा समाजाचे आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक मागासलेपण याबाबतचे म्हणणे ऐकण्यात आले. संस्था, संघटना आणि वैयक्तिक निवेदनांबरोबरच पुणे जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींनी मराठा समाजाला आरक्षणाची गरज असल्याने आरक्षण देण्याचे ठराव करून ते आयोगाकडे सादर केले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)