एसटी ठरतेय उद्रेकाची “टार्गेट’

राज्यात 353 बसेसची तोडफोड : 22 कोटींचा महसूल बुडाला

जाळपोळीत तब्बल दीड कोटी रुपयांचे नुकसान

-Ads-

पुणे – मराठा समाज आंदोलनाला राज्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले. यात गेल्या दहा दिवसांत राज्य परिवहनच्या (एसटी) 353 बसेसची तोडफोड झाली असून अनेक फेऱ्या रद्द झाल्याने तब्बल 22 कोटींचा महसूल बुडाला आहे. तर, जाळपोळीत महामंडळाचे दीड कोटींचे नुकसान झाले आहे.

गेल्या दहा दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. काही भागात आंदोलनकर्त्यांनी एसटी बसेसची तोडफोड केली. तर काही भागात एसटी बसेस जाळून देण्यात आल्या आहेत. 20 जुलैपासून सुरू असलेल्या आंदोलन कालावधीत एसटीचा 22 कोटी 2 लाख 13 हजार 749 रूपयांचा महसूल बुडाला आहे. तर तोडफोड, जाळपोळीच्या घटनेमुळे 1 कोटी 45 लाख 15 हजार 856 रूपयांचे नुकसान झाल्याचे एसटी प्रशासनाने म्हटले आहे. जमावाने आतापर्यंत सोलापूर येथे सर्वाधिक 136 बसची तोडफोड केली आहे. या सर्व उद्रेकात गेल्या दहा दिवसांत एसटी वाहतूक विस्कळीत झाल्याचे चित्र आहे.

पुणे विभागाला 72 लाखांचा फटका
एसटी महामंडळाच्या दृष्टीने पुणे हा महत्त्वाचा विभाग आहे. पण, गेल्या दहा दिवसांत विभागाला मोठा फटका बसला असून सुमारे 500पेक्षा अधिक फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. सोलापूर, नाशिक, औरंगाबाद, लातूर येथील सेवा दिवसभर बंद होती. परिणामी, जवळपास 72 लाखांचा महसूल बुडाल्याची माहिती देण्यात आली.

 10 दिवसांचा एसटी आढावा थोडक्‍यात
– राज्यातील आगारांची संख्या – 250
– आंदोलनादरम्यान तोडफोड झालेल्या बसेसची संख्या – 353
– सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक बसेसची तोडफोड – 136
– एसटीचा बुडालेला महसूल – 22 कोटी 2 लाख 13 हजार 749 रुपये
– राज्यभरात तोडफोडीमुळे झालेले नुकसान – 1 कोटी 45 लाख 15 हजार 856 रूपये

 

पीएमपीचे तब्बल 87 लाखांचे नुकसान
चाकण येथे सोमवारी मराठा समाज आंदोलनाला हिंसक वळण लागले. यात जमावाने सरकारी, खासगी वाहने पेटवल्या. दरम्यान, यात पीएमपीच्या 10 बस जाळल्या, तर 5 बसेसची तोडफोड केली. यात प्रशासनाचे जवळपास 87 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

चाकण येथील आंदोलनात एसटी आणि पीएमपी बसेसची तोडफोड करत काही बस जाळण्यात आल्या. यामध्ये पीएमपीच्या मालकीच्या 12 बसेसचे 54 लाख 30 हजार, तर भाडेतत्वावरील 4 बसेसचे 33 लाख रुपयांचे नुकसान झाले. यामुळे अगोदरच तोट्यात चाललेल्या पीएमपीला आंदोलनाचा मोठा फटका बसला आहे.

दुसऱ्या दिवशीही वाहतूक बंद
राजगुुरुनगर आणि चाकण परिसरात सोमवारी झालेल्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर पीएमपी प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने मंगळवारी या मार्गावरील वाहतूक बंद ठेवली होती. यामुळे पुण्याहून एकही पीएमपी बस या मार्गावर सोडण्यात आली नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)