मराठा समाजाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी शक्‍य

जिल्हाधिकारी नवल किशोर राम : निवेदन स्वीकारल्यानंतर आश्‍वासन

पुणे – राजर्षी छत्रपती शाहू महाराज फी प्रतिपूर्ती योजना व डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता या योजनांचा लाभ अधिकाधिक विद्यार्थ्यांना देण्यासाठी लवकरच शिक्षण विभाग आणि मुख्याध्यापक यांची बैठक घेण्यात येणार आहे. जेणेकरून या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे शक्‍य होईल, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मराठा क्रांती मोर्चाने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले. त्यानंतर ते आंदोलनकर्त्यांशी बोलत होते. फी प्रतिपूर्ती योजनेंतर्गत 8 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना फीमध्ये 50 टक्के सवलत दिली जाणार आहे. तर वार्षिक एक लाखाच्या आत उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना 100 टक्के सवलत मिळणार आहे. याचबरोबर डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता दिला जाणार आहे. या दोन्ही योजनेच्या अंमलबजावणीसाठी 15 ऑगस्ट नंतर शैक्षणिक संस्था आणि शिक्षण विभागाचे अधिकारी यांची बैठक घेतली जाणार आहे. या योजनेचा लाभ अधिकाधिक विद्यार्थांना देण्याच्या सूचना शैक्षणिक संस्था दिल्या जाणार असल्याचे राम यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)