राज्यभरात ‘महाराष्ट्र बंद’ला उस्फुर्त प्रतिसाद : पुण्यात कडकडीत बंद

पुणे – क्रांती दिनाचे औचित्य साधत आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. मराठी आरक्षणाच्या मागणीवरून गेल्या काही दिवसांमध्ये आक्रमक झालेला मराठा आंदोलनाने आजचा बंद शांततेने पाळण्याचे आवाहन केले आहे. तर पोलिसांनीही कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. शिवाय संपूर्ण राज्यात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून ठिकठिकाणी छावणीचे स्वरूप आल्याचे चित्र आहे.

महाराष्ट्र बंदमधून नवी मुंबई, ठाणे आणि नाशिक वगळण्यात आल्याचे मराठा क्रांती मोर्चाकडून सांगण्यात आले आहे. तरीही सुरक्षेच्या कारणास्तव या भागातील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. राज्यातील अनेक शाळा व महाविद्यालयांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

-Ads-

पुण्यातील अनेक छोट्या-मोठ्या खासगी कंपन्यांना सुट्या देण्यात आल्या असल्याने कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याचे कंपनीमार्फत सांगण्यात येत आहे. शिवाय पुण्यातील सार्वजनिक वाहतूक पूर्णतः ठप्प झाली असून एसटी बसेस आगारातच उभ्या आहेत. पुण्यात सुरक्षेच्या दृष्टीने शिरुर, खेड, बारामती, जुन्नर, मावळ, दौंड आणि भोर या तालुक्यांमध्ये तसेच पंढरपूर येथेही इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी चाकणमध्ये झालेला हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत ड्रोनद्वारे लक्ष आंदोलकांवर ठेवले जात आहे. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरही वाहतूक अगदीच तुरळक सुरु असून कान्हे फाटा येथे भजन कीर्तन करून आंदोलक शासनाचा निषेध करत आहेत.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)