लांब पल्ल्याच्या एसटी बसेस आज बंद राहणार

जिल्ह्यांतर्गत वाहतूक परिस्थितीनुसार धावणार

पुणे – मराठा आरक्षणासाठी आज राज्यभरात आंदोलन होणार आहे. यादरम्यान एसटीचे मोठे नुकसान होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारी बाळगण्यात येत असून सुरक्षेच्या दृष्टीने गुरूवारी लांब पल्ल्याच्या बसेस बंद ठेवण्यात येणार आहेत. विशेषतः औरंगाबाद, सोलापूर, नगर, सातारा, नाशिक या मार्गावरील काही फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.

-Ads-

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. यात एसटीला टार्गेट केले जात असून अनेक बसेस जाळण्यात आल्या आहेत. तर, जवळपास 354 एसटीची तोडफोड करण्यात आली आहे. यामुळे महामंडळाचा 22 कोटींचा महसूल बुडाला आहे. मागील आठवड्यात चाकण येथील आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने काही एसटी बसेस पेटवण्यात आल्या. यामुळे आता प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली आहे. राज्यातील इतर विभागांनी आज बसेस पाठवू नयेत, असे सांगण्यात आल्याने बसेस बंद ठेवण्यात येणार असल्याचे विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांनी सांगितले. यामुळे स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन येथून काही ठिकाणच्या फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.

मराठा समाजाकडून पुणे जिल्ह्यातही ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. मात्र, पुणे जिल्ह्यांतर्गत वाहतूक सुरू ठेवण्यात येणार आहे. वाहतूक बंद करण्यासारखी परिस्थिती असल्यास आणि पोलिसांकडून तशी सूचना आल्यास जिल्ह्यांतर्गत वाहतुकीचा निर्णय घेण्यात येईल. एकूणच परिस्थितीनुसार जिल्ह्यातील वाहतूक सुरू ठेवण्यात येणार आहे.
– यामिनी जोशी, विभाग नियंत्रक, पुणे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)