पुणे – एकही “एसटी’ धावली नाही!

सुमारे 1 कोटी महसूल बुडाल्याचा अंदाज

पुणे – आंदोलनामुळे गुरूवारी दिवसभर एसटी वाहतूक ठप्प होती. पुण्यातील स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन आगारातून सकाळपासूनच एकही गाडी रस्त्यावर सोडण्यात आली नाही. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्या काही दिवसांपासून आंदोलनादरम्यान जमावाकडून एसटी बसेसला टार्गेट केले जात आहे. गेल्या आठवड्यात चाकण येथील आंदोलनात सुमारे 10 एसटी बसेसचे नुकसान करण्यात आले तर, काही एसटी बसेस पेटवून देण्यात आल्या. यामुळे कोट्यवधींचे नुकसान सहन करावे लागले. गुरूवारी एसटी मार्गावर न सोडण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला. बुधवारी मध्यरात्री 12 वाजता पुण्याच्या स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन, पिंपरी-चिंचवड एसटी स्थानकातून बाहेरगावी जाणारी एकही एसटी सुटली नाही. गुरूवारी या चारही स्थानकात मिळून एसटीच्या तब्बल 700 फेऱ्या रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यामध्ये स्वारगेट स्थानकात 366, पिंपरी-चिंचवड 70, शिवाजीनगर 174 व पुणे स्टेशन येथील 90 फेऱ्या रद्द झाल्याची आकडेवारी सांगण्यात आली आहे. शहरातील तीनही स्थानकाचे मिळून जवळपास एक कोटी रूपयांचा महसूल बुडाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

बसस्थानकावर गर्दी नव्हती
गुरूवारी राज्यभरात आंदोलन होणार असल्याची माहिती सर्वसामान्यांना एक दिवस आधीच होती. यामुळे अनेक प्रवाशांनी प्रवास न करण्याचा निर्णय घेतला. परिणामी तीनही स्थानकावर गर्दी तुरळक असल्याचे दिसून आले. दरम्यान, ज्या प्रवाशांना मराठा आंदोलनाची माहिती नव्हती, अशा प्रवाशांचे हाल झाल्याचे दिसून आले.

गेल्या आठवड्यात झालेल्या आंदोलनात एसटीची तोडफोड झाल्याने होणारे नुकसान टाळण्याच्या हेतूने एसटी न सोडण्याचा निर्णय घेतला. एसटी वारंवार टार्गेट करण्यात येत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून गुरूवारी एसटीची एकही एसटी सोडली नाही. शुक्रवारपासून एसटी सेवा पूर्ववत होणार असून सर्व फेऱ्या होतील.
– यामिनी जोशी, विभाग नियंत्रक


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)