अबब… शहरात आज 7 हजार पोलिसांची फौज

कडक बंदोबस्त : “वज्र’, “वरूण’ ही दंगलरोधक वाहनेही तयार

आंदोलन शांततेत करण्याचे आवाहन : नागरिकांनो, कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नका

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे – मराठा क्रांती मोर्चा आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर पुणे शहरात गुरूवारी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांसह तब्बल 7 हजार पोलीस तैनात असणार आहेत. दरम्यान, नागरिकांनी शांततेत आंदोलन करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी केले आहे.

मराठा मोर्च्याच्या वतीने पुणे शहरात जिल्हाधिकारी कार्यालय आणि खडकमाळ येथील प्रांत कार्यालय येथे ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. तेथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असणार आहे. सर्व पोलीस ठाण्यांनाही त्यांच्या हद्दीत बंदोबस्त ठेवण्यास सांगण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये पिंपरी येथील डॉ. आंबेडकर चौकात आंदोलन होणार असल्याने तेथेही बंदोबस्त असणार आहे.

याशिवाय शहरात दंगल नियंत्रण पथकासह “वज्र’, “वरूण’ ही दंगलरोधक वाहनेही तयार आहेत. यासह पोलीस नियंत्रण कक्षाकडे इतर कर्मचारी व अधिकारी राखीव असणार आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी दिली.

नागरिकांनी शांततेत आंदोलन करावे, अफवांवर विश्‍वास ठेऊ नये, त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून माहितीची खातरजमा करून घ्यावी, असे आवाहन केले आहे. तर आयोजकांनी शांततेत आंदोलन करण्याचे आश्‍वासन दिल्याने पोलिसांचा बंदोबस्तही शांततेसाठीच आहे. आंदोलकांनी सहकार्य करावे. नागरिकांनी रोजच्याप्रमाणे कामाला जावे, त्यांना अडथळा होणार नाही, असेही पोलीस आयुक्त व्यंकटेशम यांनी स्पष्ट आहे.

शहरात असा असेल बंदोबस्त
या बंदोबस्तामध्ये 4 अतिरिक्त पोलीस आयुक्त, 10 पोलीस उपायुक्त, 15 सहाय्यक आयुक्त, 100 पोलीस निरीक्षक, 200 सहाय्यक निरीक्षक/उपनिरीक्षक आणि 6 हजार पोलीस कर्मचारी असा फौजफाटा रस्त्यावर असणार आहे. त्याचप्रमाणे एसआरपीएफचे 3 पथके असून, एक पिंपरी चिंचवड, दुसरे पुण्यात तर तिसरे राखीव ठेवण्यात आले आहे.


ग्रामीण पोलिसांचाही खडा बंदोबस्त 
मराठा आरक्षण आंदोलनात चाकण येथे झालेल्या जाळीपोळीच्या पार्श्‍वभूमीवर ग्रामीण पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे. जिल्ह्यातील नाशिक, सातारा, नगर, सोलापूर यासह मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस-वे या सर्व महामार्गांवर अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खबरदारी घेतली आहे. जिल्ह्यात 2 हजार 200 पोलीस कर्मचारी, 900 होमगार्ड, 3 सीआरपीएफच्या कंपनी, 1 दंगल नियंत्रण पथक, 20 स्ट्रायकिंग कंपनी, असा बंदोबस्त तैनात केला आहे. चाकण येथे शांततेसाठी बैठक घेण्यात आली आहे, असे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)