मराठा आंदोलन : नेवासा शहरासह तालुक्यात कडकडीत बंद

नेवासे – मराठा आरक्षणासाठी क्रांती दिनानिमित्त नेवासा शहरासह तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. तालुक्यात नेवासा शहर, भेंडा, कुकाणा, सोनई, घोडेगाव या ठिकाणी सकाळी सात वाजल्यापासून चक्काजाम आंदोलन सुरू झाले आहे.

तालुक्यातील बससेवा पूर्णपणे ठप्प असल्याने बसस्थानक आणि रस्त्यांवर ही वाहने नसल्याने शुकशुकाट आहे. तालुक्यातील मुख्य बाजार पेठ बंद पडल्याने शुकशुकाट होता. पेट्रोलपंप ही ओस पडले आहेत. शाळा, महाविद्यालयही बंद ठेवण्यात आली आहेत. नेवासा फाटा, देवगड फाटा, प्रवरासंगम, भानसहिवरा, वडाळा, घोडेगाव, सोनई या प्रमुख गावांसह इतर गावांमध्ये सकाळपासून सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. शनी शिंगणापूर येथे भाविकांचा दर्शनाचा ओघ कमी आहे. तालुक्यात सर्वत्र शांततेत आंदोलन सुरू आहे. चक्काजाम ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

-Ads-


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
49 :thumbsup: Thumbs up
16 :heart: Love
17 :joy: Joy
8 :heart_eyes: Awesome
4 :blush: Great
7 :cry: Sad
19 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)