छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी ट्रक उडवला 

पाच सुरक्षा कर्मचारी जखमी 

रायपुर –
छत्तीसगडच्या बिजापुर जिल्ह्यात आज माओवाद्यांनी आयईडी स्फोटाचा वापर करून एक ट्रक उडवला. त्यात पाच सुरक्षा कर्मचारी जखमी झाले. एक नागरीकही यात गंभीर जखमी झाला आहे. सुरक्षा कर्मचारी निवडणूक ड्युटी करून आपल्या मुळ ठिकाणी परत येत असताना हा प्रकार घडला.

जखमी जवानांमध्ये चार बीएसएफचे जवान आहेत तर एक जण जिल्हा राखीव दलाचा जवान आहे. बिजापुरच्या घाटी भागात आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमाराला हा प्रकार घडला. हे ठिकाण राजधानी रायपुर पासून 450 किमी अंतरावर आहे.

-Ads-

माओवाद्यांनी सुरक्षा दलांच्या वाहनांच्या रस्त्यावरच हा बॉंब लावून ठेवला होता. तेथेच काही नक्षलवादी लपून बसले होते. स्फोटानंतर त्यांनी सुरक्षा जवानांवर गोळीबार सुरू केला. जखमी अवस्थेतील जवानांनी प्रतिगोळीबार सुरू केल्यानंतर हे हल्लेखोर पळून गेले. जखमी जवानांना हेलिकॉप्टरने रायपुला नेण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)