दंतेवाड्यातील दूरदर्शन कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याची जबादारी माओवाद्यांनी स्वीकारली 

रायपुर – छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात गेल्या 30 ऑक्‍टोबरला दूरदर्शनच्या पथकावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी माओवाद्यांनी स्वीकारली आहे. तथापी प्रसार माध्यमांना लक्ष्य करण्याचा आमचा हेतू नव्हता असे या संघटनेने म्हटले आहे.

या हल्ल्यात तीन पोलिस कर्मचारी आणि दूरदर्शनचा एक कॅमेरामन असे एकूण चार जण ठार झाले आहेत. या घटनेच्या संबंधात सीपीआय माओवाद्यांनी सोशल मिडीयावर एक संदेश प्रसारीत करून या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. आमचे वास्तव्य असलेल्या भागात माध्यमांच्या प्रतिनिधींनी पोलिसांचे संरक्षण घेऊन प्रवेश करू नये अशी सुचनाही माओवाद्यांनी केली आहे.

माओवाद्यांचा म्होरक्‍या साईनाथ याच्या नावाने हा संदेश त्यांनी सोशल मिडीयावर टाकला आहे. अरणपुर आणि बरगम गावात पोलिसांची मदत घेऊन सरकारने जबरदस्तीने रस्ता बांधणीचे काम सुरू केले आहे त्याला आमचा विरोध होता त्यामुळे आम्हाला हा गोळीबार करावा लागला आहे असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान या संदेशाची खातरजमा केली जात आहे अशी माहिती पोलिसांच्यावतीने देण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)