माओवादी संबंध प्रकरण : क्‍लोन कॉपी देण्याचा आदेश

पुणे – बंदी घातलेल्या माओवादी संघटनांशी संबंध असल्याच्या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींना क्‍लोन कॉपी देण्यात यावी, असा आदेश विशेष न्यायाधीश के.डी.वडणे यांनी दिला.

जिल्हा न्यायालयातील नाझर यांनी तपास अधिकाऱ्याला नोटीस देऊन फॉरेन्सिक लॅब्रोटरी (एफएसएल) च्या उपस्थितीत आरोपी आणि त्यांच्या वकिलांना क्‍लोन कॉपी देण्यात यावी. त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि पंचनामा करावा. कॉपीची एक प्रत न्यायालयीन रेकॉर्डसाठी ठेवण्यात यावी, असे आदेशात नमूद आहे. आरोपींना क्‍लोन कॉपी दिल्यास जप्त करण्यात आलेल्या इलेक्‍ट्रॉनिक डिव्हाईसमधील गोपनीय माहिती फुटण्याची शक्‍यता आहे, अशी माहिती गुरुवारी सरकारी पक्षाकडून न्यायालयास देण्यात आली होती. या प्रकरणातील संशयित आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलाखा यांचा जामीन आणि त्यांच्यावरील गुन्हा रद्द करण्यासंबंधी सुनावणी सुरू आहेत. त्यामुळे अटकेत असलेल्यांना क्‍लोन कॉपी दिल्यास त्यातील गोपनीय माहिती लिक होईल, असे सरकारी पक्षाने न्यायालयात सादर केलेल्या लेखी अर्जात म्हटले होते. गेल्या अनेक दिवसांपासून क्‍लोन कॉपी देण्यावरून दोन्ही पक्षांचा युक्तिवाद सुरू होता. मात्र पुरावे लिक न होण्याचे कारण देत सरकार पक्षाने अचानक कॉपी देण्यास नकार दिला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)