नवीन आर्थिक वर्षात अनेक नियम बदलणार

-पॅन कार्डला आधार लिंक झालेले आवश्‍यक
-कनेक्‍टिंग ट्रेन सुटल्यास रेल्वे प्रवाशांना भरपाई
-कागदावरील शेअरना डिमॅट करून घेणे आवश्‍यक

नवी दिल्ली – पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2019 आहे. जर आपण 31 मार्चपूर्वी आधार कार्ड पॅन कार्डला जोडले नाही, तर ते निष्क्रिय होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आधार योजनेला संवैधानिक असल्याचे सांगत रिटर्न फाइल आणि पॅन कार्ड जोडणं गरजेचे केले आहे. एप्रिलपासून विजेचे बिलही प्रीपेड होणार आहेत. आता रिचार्जच्या माध्यमातून विजेचा वापर करता येणार आहे. घरांमध्ये नवे प्रीपेड मीटर बसवण्यात येणार आहे.

रिअल इस्टेट सेक्‍टरमध्येही नवे जीएसटी दर 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत. नव्या दरानुसार स्वस्त घरांवरील जीएसटी 1 टक्का राहणार आहे. उच्च श्रेणीतल्या घरांवरील जीएसटी 5 टक्के होणार आहे. सध्या ते दर 8 टक्के आणि 12 टक्के आहेत. ईपीएफओचे नवे नियम लागू झाल्यानंतर फंड ट्रान्सफर करणेही अगदी सोपे होणार आहे. नोकरी बदलल्यानंतर आपले पीएफ अकाऊंटही ट्रान्सफर करणे सहजशक्‍य आहे.

रेल्वे प्रवाशांच्या सेवेतही 1 एप्रिलपासून नवी सुविधा येणार आहे. जर कनेक्‍टिंग ट्रेन सुटल्यास प्रवाशाला पैसे परत दिले जाणार आहेत. फक्त दोन्ही तिकिटांवरची प्रवाशाची माहिती समान असायला हवी, अशी एक अट आहे. कनेक्‍टिंग ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशाला पहिली ट्रेन लेट झाल्याने दुसरी ट्रेन पकडता येत नाही. अशातच रेल्वे प्रशासन प्रवाशांना तिकिटाचे पैसे परत देणार आहे.

एप्रिलपासून सेबीच्या नियमांमध्येही बदल होणार आहे. जर शेअर्स कागदावर असतील तर त्यांना डीमॅट अकाऊंटच्या माध्यमातून डिजिटल करवून घेण्याची गरज आहे. 1 एप्रिल 2019 पासून डीमॅट खात्यावर असलेले शेअर्स(डिजिटल) वैध समजले जाणार आहेत. एक एप्रिलनंतर 125 सीसीहून जास्त पॉवरची मोटारसायकल असल्यास त्यात अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम गरजेचे आहे. त्याशिवाय 125 सीसीमध्ये कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीम असणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)