राजस्थानात वसुंधरा राजेंना मानवेंद्र सिंगांचे आव्हान

झालवार मतदारसंघात दोन मोठे नेते आमनेसामने

जयपूर: भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंग यांचे पुत्र मानवेंद्र सिंग यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे राजस्थानच्या राजकीय वर्तुळामध्ये मोठा भूकंप झाला होता. आता काँग्रेसद्वारे मानवेंद्र सिंग यांना आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये राजस्थानच्या विद्यमान मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. वसुंधरा राजे यांच्या हक्काचा मानला जाणाऱ्या झालवार मतदारसंघाने यापूर्वी सलग तीनवेळा राजेंना कौल दिला आहे.

मानवेंद्र सिंग यांना विद्यमान मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याविरोधात तिकीट देत काँग्रेस मूळचा भाजपाचा मानला जाणारा ७ टक्के ‘राजपूत’ ‘व्होटरबेस’ आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न करत असल्याचे मानले जात आहे. २०१३च्या विधानसभा निवडणुकांमध्ये मानवेंद्र सिंग यांनी साहिओ मतदारसंघातून विजय मिळवला होता. आता ते वसुंधरा राजेंच्या विरोधात झालवार मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याने ही निवडणूक रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

याबाबत बोलताना मानवेंद्र सिंग म्हणाले की, “मी या आव्हानासाठी तयार आहे.” तसेच “राजस्थानातील जनता राजपूत नेते जसवंत सिंगांचा भाजपाने केलेल्या अपमानाचा नक्कीच बदला घेईल.” असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)