मनू भाकेर-सौरभ चौधरी जोडीला सुवर्णपदक ; रशियाच्या जोडीचा मोडला विक्रम

नवी दिल्ली: येथे पार पडलेल्या नेमबाजी विश्‍वचषकानंतर सुवर्णपदकाची कमाई केलेल्या मनू भाकेर-सौरभ चौधरी जोडीने पुन्हा एकदा धडाकेबाज कामगिरीची नोंद केली आहे. चायनिज तैपेईत सुरु असलेल्या 12 व्या आशियाई एअरगन चॅम्पियनशीप स्पर्धेत मनू-सौरभ जोडीने सुवर्णपदक पटकावले आहे. या जोडीने 10 मी. एअर पिस्तुल प्रकारात विश्‍वविक्रमी कामगिरी करत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

पात्रता फेरीत भारतीय जोडीने 784 गुणांची कमाई करत, रशियाच्या जोडीचा विक्रम मोडीत काढला. काही दिवसांपूर्वी झालेल्या युरोपियन चॅम्पियनशीप स्पर्धेत रशियाच्या व्हिटॅलीना आणि आर्टेम जोडीने 484.8 गुण कमावले होते. आजच्या स्पर्धेत कोरियन जोडीला रौप्य तर चायनिज तैपेई जोडीला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. याच प्रकारात भारताच्या अनुराधा आणि अभिषेक वर्मा जोडीने अंतिम फेरी गाठली होती. मात्र त्यांना 372.1 गुणांसह चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)