नगर- मनपाची मुख्य जलवाहिनी फुटली

शहराचा तीन दिवस पाणीपुरवठा विस्कळीत

नगर – महापालिकेची मुख्य जलवाहिनी फुटल्याने शहराचा दोन दिवस पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. खडकवाडी येथे ही जलवाहिनी फुटली आहे. या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आल्याने ते उद्या (बुधवारी) सकाळी अकरा वाजता पूर्ण होणार आहे. मुळानगर, विळद येथून होणारा पाण्याचा उपसा थांबविण्यात आला आहे. परिणामी पुढील तीन दिवस शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बोल्हेगाव, नागापूर, सोवडी उपनगरातील पाईपलाईन रोड, लक्ष्मीनगर, सूर्यनगर, निर्मलनगर, स्टेशन रोड, सारसनगर, विनायकनगर, मुकुंदनगर, केडगाव, नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसर या भागाला उद्या बुधवारी पाणीपुरवठा होणार नाही. शहरी भागातील मंगलगेट, रामचंद्र खुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडईल, काळू बागवानगल्ली, धरती चौक, माळीवाडा, कोठी, गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हिल हडको, प्रेमदान हडको, म्युनिसिपल हडको या भागाला गुरूवारी (ता. 14) पाणीपुरवठा होणार नाही. या भागाल शुक्रवारी (ता. 15) पाणीपुरवठा होणार आहे.

सर्जेपुरा, तोफखाना, सिद्धार्थनगर, लालटाकी, दिल्लीदरवाजा, नालेगाव, चितळे रोड, ख्रिस्त गल्ली, कापडबाजार, माळीवाडा, बालिकाश्रम रोड व सावेडीचा काही परिसराला शुक्रवारी (ता. 15) पाणीपुरवठा होण्याऐवजी शनिवारी (ता. 16) पाणीपुरवठा होईल. या काळात नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)