‘मनोरा’ आमदार निवास रिकामा करा! 

विधीमंडळ प्रधान सचिवांचे आमदारांना पत्र 

मुंबई – मुंबईतील मनोरा आमदार निवास इमारतीची पुनर्बांधणी करण्यात येत आहे. या इमारतीमधील अनेक सदनिकांमध्ये स्लॅंब कोसळण्याच्या घटना घडल्या असतानाही आमदारांनी आपल्या ताब्यातील सदनिका सोडलेल्या नाहीत. त्यामुळे आमदारांनी 31 ऑक्‍टोंबरपुर्वी आपली सदनिका रिकामी करावी. जे आमदार आपली सदनिका रिकामी करणार नाहीत ते स्वतःच्या जबाबदारीवर त्या ठिकाणी वास्तव्य करत आहे असे समजण्यात येईल, असे पत्रच विधीमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांनी आमदारांना धाडले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मंत्रालयासमोर असलेल्या मनोरा आमदार निवासाला एक वेगळी ओळख आहे. अधिवेशनानिमित्त किंवा आपल्या कामकाजानिमित्त मुंबईत येणा-या ग्रामीण भागातील आमदारांना मनोरा आमदार निवास मोठा आधार ठरतो.
परंतु, गेल्या काही महिन्यांपूर्वी आमदारांच्या रुममध्ये सलॅब कोसळण्याच्या घटना घडला होत्या. त्यावरुन विधीमंडळात आमदारांनी प्रश्नही उपस्थित केला होता. त्यावेळी मनोरा आमदार निवास पाडून त्याठिकाणी नवीन बांधकाम करण्यात येईल असे आश्वासन सरकारने दिले होते. तसे या संदर्भात मनोरा आमदार निवास उच्चाधिकार समितीही नेमली होती. या समितीने मनोरा आमदार निवास रहाण्याच्यादृष्टिने धोकादायक म्हणून घोषित केली होती.

मनोरा इमारत रिकामी करण्यासाठी आमदारांना यापुर्वी लेखी स्वरुपात कळविण्यात आले होते. मात्र, त्याला काही आमदारांनी प्रतिसाद दिला. तर काही आमदारांनी या सूचनेकडे दुर्लक्ष केले. या इमारतीचे तोडकाम करून पुनर्विकासाचे काम सुरू करायचे आहे. त्यामुळे मनोरामध्ये वास्तव्य असणा-या आमदारांनी आपल्या ताब्यातील सदनिका 31 आँक्‍टोबरपूर्वी रिकामी करावी, असे निर्देश विधिमंडळाचे प्रधान सचिव कळसे यांनी पत्राद्वारे दिले आहेत. जे आमदार स्वतःच्या ताब्यातील कक्ष रिक्त करणार नाहीत ते स्वतःच्या जबाबदारीवर त्या ठिकाणी वास्तव्य करत आहेत असे समजण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)