“सोनचिडिया’मध्ये मनोज वाजपेयीची दमदार भूमिका

मध्य भारतातील डकैतीवर आधारित असलेल्या बहुप्रतीक्षित “सोनचिडिया’मध्ये मनोज वाजपेयीचा दमदार अभिनय प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून चित्रपटाबाबत दर्शकांची जिज्ञासा वाढली आहे.
“सोनचिडिया’मध्ये सुशांत सिंह राजपूत मुख्य भूमिका साकारत आहे. ट्रेलरमध्ये सुशांत डाकूच्या भूमिकेत दिसत असून मनोज वाजपेयीने पुन्हा एकदा आपल्या दमदार डायलॉगने प्रत्येक चाहत्यांची मने जिंकली आहेत.

मनोज वाजपेयीची झलक पाहिल्यानंतर असा कयास लावला जात आहे की, तो डाकू मान सिंहची भूमिका साकारत आहे. डाकू मान सिंह हा आग्रामधील कुप्रसिद्ध डकैती होता. त्याच्यावर हत्या करण्याचे 185, तर लुटमार करण्याचे 1,112 गुन्हे दाखल होते. मात्र, गरिबांमध्ये त्याची छवि रॉबिन हुडप्रमाणे होती. सर्वसामान्य आणि गरीब लोकांना त्यांचा हक्‍क आणि न्याय मिळवून देण्यासाठी त्याने खुनी खेळ खेळला. मात्र, कोणत्याही असहाय माणसावर अन्याय केला नाही.

“उडता पंजाब’ आणि “इश्‍किया’ यासारख्या चित्रपटातून दर्शकांचे मनोरंजन केलेले दिग्दर्शक अभिषेक चौबे यांनी “सोनचिडिया’चे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात सुशांत सिंह राजपूत, भूमि पेडनेकर, मनोज वाजपेयी, रणवीर शोरे आणि आशुतोष राणा महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)