मनोहर पर्रिकर पुन्हा रुग्णालयात दाखल

पणजी: गोव्याचे मुख्यमंत्री मनोहीर पर्रिकर यांना शनिवारी रात्री पुन्हा एकदा उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर जीआय एन्डोस्कोपी करुन 48 तास देखरेखीखाली ठेवले जाणार आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्‍टरांनी दिल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून कळवण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांना गोमेकॉत दाखल केल्याचे समजताच आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी गोमेकॉत धाव घेत पर्रिकर यांच्या तब्येतीची चौकशी केली. पर्रिकर यांची तब्येत स्थिर असून त्यांना लवकरच डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राणे यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राणे म्हणाले, आपण पर्रिकर यांच्याशी बोललो. पर्रिकर यांच्यावर कोणतीही सर्जरी किंवा एन्डोस्कोपी झालेली नाही. नियमित तपासणीसाठी त्यांना गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. चिंता करण्याचे कोणतेच कारण नाही. पर्रिकर यांनी आपल्याला घरी जायला सांगितले असून ते डॉक्‍टरांच्या देखरेखीखाली आहेत. त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळू शकतो.
दरम्यान, मनोहर पर्रिकर हे स्वादुपिंडाचा कर्करोगाने ग्रस्त आहेत. याआधी त्यांच्यावर गोवा, मुंबई, न्यूयॉर्कमधील रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. महिनाभरापूर्वी त्यांना उपचारांसाठी दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)