अटलजींनी थांबवला मनमोहन सिंगांचा राजीनामा

– सुनीता जोशी

राजकारणात विरोधी पक्षांकडून एखाद्या नेत्याचा राजीनामा मागितला जाणे हे दृश्‍य सर्रास पाहायला मिळते. अलीकडील काळात वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडियाचा सुळसुळाट झाल्यामुळे एखाद्या क्षुल्लक किंवा किरकोळ घटनेलाही अवास्तव महत्त्व देऊन रान पेटवले जाते आणि त्याबाबत थेट पंतप्रधान-मुख्यमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते, पण यासंदर्भात 28 वर्षांपूर्वीचा एक किस्सा आवर्जून लक्षात घेण्याजोगा आहे.

1991 मध्ये केंद्रामध्ये पी. व्ही. नरसिंहराव यांचे सरकार होते. राव सरकारमध्ये अर्थमंत्रिपदाची जबाबदारी डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे होती. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी हे विरोधी पक्षनेते होते. मनमोहन सिंग यांनी अर्थसंकल्प सादर करून आपले भाषण संपवले तोच विरोधी पक्षनेते म्हणून बोलताना वाजपेयी यांनी त्या अर्थसंकल्पावर सणकून टीका केली. ती टीका ऐकून मनमोहन सिंग यांनी नरसिंहराव यांना भेटून आपल्याला राजीनामा द्यावयाचा आहे असा विचार मांडला. त्यानंतर राव यांनी तत्काळ अटलजींना फोन केला आणि घडलेला सर्व प्रकार सांगितला. अटलजी लागलीच मनमोहन सिंग यांना भेटले आणि त्यांची समजूूत काढली. सभागृहामध्ये केली गेलेली कोणतीही टीका ही राजकीय स्वरूपाची असते, ती वैयक्‍तिक स्वरूपात घ्यावयाची नाही. वाजपेयींचे म्हणणे ऐकून मनमोहन सिंगांनी आपला विचार बदलला. आजच्या संसद सदनातील दृश्‍ये पाहताना हे जुने दिवस निश्‍चितच विचार करायला लावणारे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)