मांजरीत बांधकाम साईटवर गोळीबार

कामाचे थकीत 3 कोटी 72 लाख मागितल्याने दोन गटात हाणामारी

लोणीकंद पोलिसांत गुन्हा दाखल, परस्पर विरोधी तक्रारी

-Ads-

वाघोली – मांजरी खुर्द (ता. हवेली) येथील कुमार बिल्डरच्या कुल नेशन बांधकाम साईटवर दोन गटात कामाचे थकीत पैसे मागितल्याच्या कारणावरून झालेल्या हाणामारी व वादातून गोळीबार झाल्याची घटना बुधवारी (दि.1) सायंकाळी घडली. याप्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. सुब्रत शैलेन मंडल यांनी दिलेल्या फिर्यादी यानुसार गोळीबार करणारा संजू सिंग, रामेश्वर सिंग याच्यासह 5 ते 6 जणांवर खुनाचा प्रयत्न, आर्म अॅॅक्‍टचा तर संजू सिंग, रामेश्वर सिंग यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सुब्रत मंडल, हर्शीद मंडल यांच्यासह 15 ते 20 जणांवर खुनाचा प्रयत्न, दरोड्याचा गुन्हा लोणीकंद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मांजरी खुर्द येथील कुमार बिल्डरच्या कुल नेशन साईटवर सुब्रत मंडल व हर्शीद मंडल हे कामाचे थकलेले 3 कोटी 72 लाख रुपये मागण्यासाठी 15 ते 20 कामगारांबरोबर गेले असता येथील ट्रायकॉन इन्फ्रा कंपनीच्या साईटवरील संजू सिंग सोबत त्यांचा मोठा वाद झाला. वादाचे रुपांतर दोन गटाच्या हाणामारीत झाले; त्यानंतर सिंग याने त्याच्याकडील पिस्तूल मधून दोन बार हवेत तर मंडल यांच्या दिशेने चार गोळ्या मारल्या, यामध्ये सुब्रत मंडल जखमी झाले आहेत. सुब्रत मंडल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सिंग याच्यासह इतर 5 ते 6 व्यक्तींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजू सिंग यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, मंडल यांनी लाकडी दांडके, लोखंडी रॉडने मारहाण करीत दगड उचलून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंडल यांनी कंपनीतील कामगारांचे मोबाईल, पाकिटे काढून घेवून चार चाकीचे व कंपनीच्या गेटचे नुकसान केल्याचेही फिर्यादीत म्हंटले आहे. आपल्यावर झालेल्या हल्ल्यामुळे स्वसरंक्षणासाठी गोळीबार केल्याचा उल्लेख सिंग यांनी केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणास अटक केलेली नाही. पुढील तपास पोलीस उपाधीक्षक सुहास गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलीस करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)