मनिषा कोईरालाने लिहीले आत्मचरित्र 

मनिषा कोईरालाने आपले आत्मचरित्र लिहून पुर्ण केले आहे. “हील्ड’ नावाच्या या पुस्तकामध्ये मनिषाने आपला संघर्ष आणि खासगी जीवनातील अनेक अनुभव कथन केले आहेत. मनिषाने या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचा फोटो ट्‌विटरवर शेअर केला आहे. कॅन्सरमधून बरे होणे आणि आपले आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करण्याचा प्रवास तिने यात मांडला आहे. हा प्रवास म्हणजे स्वतःचा शोध घेण्याचाच प्रयत्न आहे, असे तिने ट्‌विटरवरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

“कॅन्सरने आपल्या नवीन जीवन कसे दिले.’ हे या पुस्तकाचे उपशिर्षक आहे. तिच्या आजारपणाच्या काळात निकटवर्तीयांकडून मिळालेले सहकार्य, मदत, सहानुभूती आणि काळजी या सर्व अनुभवांचे मिश्रण तिच्या या आत्मचरित्रामध्ये व्यक्‍त झाल्या असणार आहेत. कॅन्सरमधून बरे झाल्यावर सहा वर्षांनी तिने पुन्हा बॉलिवूडमध्ये काम करायला सुरुवात केली आहे.

“संजू’मध्ये तिने संजय दत्तची आई नर्गिस दत्तचा रोल उत्तम साकारला होता. त्याशिवाय नेटफ्लिक्‍सवरच्या “लस्ट स्टोरीज’मध्येही तिने काम केले होते. आता भविष्यात बॉलिवूडमध्ये कसे आणि किती ऍक्‍टिव्ह रहायचे हे मनिषाने अद्याप निश्‍चित केलेले नाही. मात्र “कमबॅक’ यशस्वीपणे केलेल्या मनिषाला तिच्या मनासारखा रोल मिळाल्यास ती निश्‍चित पुन्हा काम करेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)