मणिपूर पोलीसांनी 128 मुलामुलींना मानवी तस्करीतून सोडवले

इंफाळ (मणिपूर) : मणिपूर पोलीसांनी 108 जणांना मानवी तस्करीतून सोडवले आहे. या 108 जणांमध्ये 103 मुली आणि 5 मुलगे आहेत. त्यापैकी 73 जण नेपाळी असल्याचेही सांगण्यात आले आहे. या सर्वांना पोलीसांनी राजधानी इंफाळमधील विविध हॉटेल्सवर छापे घालून वाचवले आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने मणिपूर पोलीसांनी ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले.

इंफाळ पोलीस आणि कमांडोज यांनी म्यानमार सीमेला लागून असलेल्या मोरेह कस्ब्यातील लेंगनपॉल हॉटेलावर छाप्यात 15 मुलांना व 5 मुलींना सोडवले. पोलीस अधिकारी संदीप गोपाल दास यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या मुलींना परदेशात पाठवण्यात येणार होते. प्रथम म्यानमार व तेथून इराक व दुबईला त्यांची रवानगी करण्यात येणार होती. ही मुले मानवी तस्करीची बळी आहेत की त्या टोळीचे सदस्य आहेत याचा शोध घेण्यासाठी त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)