“मणिकर्णिका’च्या शुटिंगचा व्हिडिओ व्हायरल

बॉलीवूडमध्ये नववर्षात प्रदर्शित झालेल्या कंगना राणावतच्या “मणिकर्णिका’ चित्रपटाने बॉक्‍स ऑफिसवर चांगली कमाई केली. या चित्रपटातील कंगनाच्या कामाचे गोड कौतुकही करण्यात आले. तसेच चित्रपटातील युद्धाच्या सीनची चर्चाही झाली. सध्या कंगनाचा युद्धाच्या सीनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

यात कंगना ब्रिटीशांविरुद्ध दोन हात करताना दिसत आहे. हे दृश्‍य युद्धाचे असले तरी व्हिडिओ पाहताना तुम्हाला तुमचं हसू आवरणार नाही. व्हिडिओ नीट पाहिल्यावर कळतं की कंगना एका खोट्या घोड्यावर बसली आहे. हा खोटा घोडा ट्रॉलीवर अर्थात मशीनवर आहे. त्यावर बसून कंगना तलवारबाजी करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या घोड्याला पाय आणि शेपटीही नाही. सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत आहे. यामुळे सध्या कंगना चांगलीच ट्रोल होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एका युझरने लिहिले की, “लकडी की काठी, काठी का घोडा’. तर दुसऱ्या युझरने लिहिले की, “घोडा छाप, एकाहून एक कमेंट तिच्या या व्हिडिओवर पाहायला मिळत आहेत. अजून एका युझरने या व्हिडिओला कमेंट करताना लिहिले की, डोंगर पोखरून निघाली उंदरीण. कंगनाल ट्रोल करण्याचं मुख्य कारण म्हणजे मणिकर्णिका चित्रपटाच्या प्रमोशनवेळी कंगनाने मुलाखतीत मी एक वर्ष ती घोडेस्वारी शिकत होती, असे सांगितले होते.

https://www.youtube.com/watch?v=JiMg9dganb8

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)