‘मणिकर्णिका’ चित्रपटाने कमाईत पार केला ‘इतक्या’ कोटींचा आकडा

पुणे-  कंगना राणावतचा ‘मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झाँसी’ हा चित्रपट  25 जानेवारीला प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत 50 कोटींचा आकडा पार केला आहे.

‘मणिकर्णिका’ हा चित्रपट देशभरात 3000 आणि ओवरसीजमध्ये 700 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. जगभरात 50 देशात एकसाथ हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. तसेच हा चित्रपट हिंदी शिवाय तामिळ आणि तेलुगू भाषेतसुध्दा डब करून प्रदर्शित करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झाँसी’  हा चित्रपट राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित आहे. राणी लक्ष्मीबाईच्या मुख्य भूमिकेत असणारी कंगना राणावत आहे. या चित्रपटात कंगना राणावतसह  अंकिता लोखंडे, सुरेश ओबेरॉय, कुलभूषण खरबंदा सारखे कलाकारही झळकले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)