कर्नाल उमेदवारीसाठी मनेका गांधी इच्छुक

नवी दिल्ली – मनेका गांधी पिलीभीत लोकसभा मतदारसंघात वरुण गांधी यांना उमेदवारी मिळावी याकरता प्रयत्नशील आहेत. तसेच त्यांनी स्वत:ला कर्नाल मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा असल्याचे मनेका यांनी पक्षनेतृत्वाला कळविले आहे.

पिलीभीतमध्ये वरुण यांना संधी दिली जावी असेही मनेका यांनी पक्षनेतृत्वाला सुचविले आहे. वरुण हे सध्या उत्तर प्रदेशच्या सुलतानपूरचे खासदार आहेत.

दरम्यान, 1989 ते 2014 या काळात मेनका गांधी या सहा वेळा पीलीभीतमधून खासदार म्हणून निवडून आलेल्या आहेत. शिवाय, 2009मध्ये वरुण गांधी देखील पिलिभितमधून विजयी झाले आहेत. मतांची टक्केवारी आणि मतांचा आकडा पाहता पिलिभितनं कायम मेनका गांधी यांना साथ दिलेली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)