मॅंचेस्टर युनायडेड ने चेल्सीला नमविले

लंडन: पॉल पोग्बा आणि अँडर हरेरा यांनी केलेल्या गोलच्या जोरावर मॅंचेस्टर युनाइटेडने एफए कप फुटबॉल स्पर्धेच्या पाचव्या फेरीत चेल्सीचा 2-0 असा पराभव करत उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला. अँडर हरेराने 31 व्या मिनिटाला तर पॉल पोग्बाने 45व्या मिनिटाला गोल करत आघाडी 2-0 केली होती. दोन्ही गोल पहिल्याच सत्रात हेडर द्वारे नोंदवले गेले.
पहिल्या सत्राच्या सुरुवातीपासूनच मॅंचेस्टरचा संघ भरात होता. त्याने काही आक्रमक चाली रचल्या. 31 व्या मिनिटाला मार्शलने लेफ्ट विंग वर चाल रचत चेंडू बॉक्‍समध्ये टाकला त्यावर हरेराने गोल करत आघाडी मिळवून दिली.त्यानंतर चेल्सीने बरोबरी साधण्याचा प्रयन्त सुरु केले. प्रतिआक्रमणात 45 व्या मिनिटाला पोग्बाने गोल करत मॅंचेस्टरला भक्कम स्थितीत आणले. दुसऱ्या सत्रात दोनही संघ गोल करण्यात अपयशी ठरले. मगील 13 सामन्यात मॅंचेस्टरचा हा 11 वा विजय आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)