पोर्तुगाल अोपन स्पर्धा : मानव ठक्करने पटकावले दोन सुवर्ण

नवी दिल्ली – भारताचा टेबल टेनिसपटू मानव ठक्कर याने नुकत्याच पार पडलेल्या पोर्तुगाल ज्युनियर आणि कॅडेट अोपन स्पर्धेमध्ये एकेरी व दुहेरी गटात विजेतेपद पटकावित सुवर्णपदक जिंकले.

मानवने एकेरी गटातील अंतिम सामन्यात भारताच्याच जीत चंद्राचा 11-5, 7-11, 10-12, 11-8, 9-11, 11-4, 11-9 असा पराभव केला. दरम्यान उपांत्य फेरीत मानवने स्नेहीत सुरावज्जुला यांचा 11-8, 6-11, 11-7, 11-5, 7-11, 6-11, 11-4 ने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

दुहेरीमध्ये मानव ठक्कर आणि मानुष शहा या जोडीने अंतिम फेरीत भारताच्याच जीत चंद्रा आणि स्नेहित सुरावज्जुला या जोडीचा 11-7,11-6,13-15,7-11,11-6 अशी मात करून विजेतेपद पटकावले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)