केजरीवालांच्या घरी बंदुकीच्या गोळ्या घेऊन गेलेल्या इसमाला अटक 

नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी बंदुकीच्या गोळ्या घेऊन गेलेल्या एका इसमाला पोलिसांनी अटक केली आहे. मोहमद इम्रान असे या इसमाचे नाव आहे तो करोलबाग येथील एका मशिदीचा केअरटेकर आहे.

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात मुख्यमंत्र्यांकडे मागण्यांचे एक निवेदन घेऊन मुस्लिम धर्मगुरूंचे एक शिष्टमंडळ तिकडे गेले होते. त्यात या इम्रानचा समावेश होता. या शिष्टमंडळात 12 इमाम आणि मौलवींचा समावेश होता. दिल्ली वक्‍फ बोर्डाच्या कर्मचाऱ्यांना वेतन वाढ करावी या मुख्य मागणीसाठी हे शिष्टमंडळ केजरीवालांकडे आले होते. त्यावेळी करण्यात आलेल्या सुरक्षा तपासणीच्यावेळी इम्रान याच्याकडे पॉईन्ट 32 बंदुकीची काडतुसे सापडली. त्यानंतर त्याला लगेच स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्याच्या विरोधात संबंधीत कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

-Ads-

या गोळ्यांच्या संबंधात पोलिसांना माहिती देताना इम्रान याने सांगितले की मला मशिदीच्या दान पेटीत दोन-तीन महिन्यांपुर्वी ही काडतुसे सापडली. ही काडतुसे मी यमुना नदीत फेकून देणार होतो पण मी ही काडतुसे माझ्या पाकिटात ठेवली. ती तशीच माझ्या पाकिटात राहीली. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)