पत्नीसाठी ‘मिनी’ ताजमहाल बांधणारा अवलिया काळाच्या पडद्याआड

लखनऊ : उत्तर प्रदेशातील पेशाने साधे पोस्टमास्टर असलेल्या फैजल हसन कादरी यांचे नाव काही दिवसांपूर्वी प्रसार माध्यमांच्या प्रकाश झोतात आले होते. त्यांचं नाव माध्यमांमध्ये येण्याचं कारण देखील तसं विशेषच होत, आपल्या दिवंगत पत्नीसाठी त्यांनी चक्क ‘मिनी ताजमहाल’ बांधण्याचा निश्चय केला होता, परंतु पैशांअभावी त्यांचं स्वप्नं अर्धवटच राहील.

आपल्या पत्नीसाठी आपल्या ऐपतीप्रमाणे ‘ताजमहाल’ बांधणाऱ्या ८३ वर्षीय फैजल हसन कादरी यांचा आज अपघातामध्ये मृत्यू झाला. केसर कलान येथे गुरुवारी कादरी यांना एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते. एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचारा दरम्यान त्यांचा अंत झाला.

कादरी यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचा निश्चय केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
2 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
5 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)