ग्रामविस्तार अधिकारी व कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण

संगमनेर: ग्रामपंचायतीचे ग्रामविस्तार अधिकारी व इतर कर्मचारी शासकीय घरकुल लाभार्थींचे सर्वेक्षण करीत असतांना एका स्थानिक इसमाने ग्रामविस्तार अधिकारी यांना शिवीगाळ करत कर्मचारी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना संगमनेर तालुक्यातील साकूर येथे बुधवार दि. १९ रोजी घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, साकूर ग्रामपंचायत ग्रामविस्तार अधिकारी संतोष दिगंबर गोडे बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह शासकीय घरकुल लाभार्थींचे सर्वेक्षण कामकाज करत होते. वसीम हसन पटेल (रा.साकूर) हा त्या ठिकाणी आला व गोडे यांना अरेरावी शिवीगाळ करुन ‘तुम्ही लोक चालुगिरी करता’ असे म्हणून कर्मचारी उमेश अशोक गाडेकर याची गच्ची धरुन त्यास लाथाबुक्क्याने मारहाण करुन त्याचेकडील कार्यालयीन कागदपत्रे फेकून सर्वेक्षण फॉर्म फाडून टाकत शासकीय कामात अडथळा आणला. त्यामुळे याप्रकरणी गोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन घारगाव पोलिसांनी वसीम पटेल याच्याविरुद्ध भादंवि कलम ३५३, ३३२, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्री.मोहिते हे करत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)