पत्नीच्या ऑफिसमध्ये घुसून पतीने केला खून 

file photo

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील भायंदर येथे आज घडलेल्या हत्याकांडामुळे एकच खळबळ उडाली. कुमार भोईर नामक एका ३२ वर्षीय इसमाने आपली पत्नी वीणा (वय ३५) हिचा तिच्या कार्यालयामध्ये जाऊन निर्घृण खून केला आहे.

याबाबत भायंदर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश जाधव यांनी सांगितले की, “आज सकाळी १०.३०च्या सुमारास कुमार भोईर नामक इसम त्याची पत्नी वीणा हिच्या कार्यालयामध्ये दाखल झाला. यानंतर दोघांमध्ये जोराचे वाद सुरु झाले आणि संतापलेल्या कुमार भोईर याने पत्नी वीणा हिच्यावर धारदार शस्त्राने वार केले. यानंतर वीणा हिला तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले मात्र तिचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.”

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वीणा ही गेल्या २ जानेवारीपासून आपल्या पतीपासून घर सोडून निघून गेली असल्याची माहिती देखील पोलिसांच्या हाती लागल्याचे जाधव यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)