ममतादीदींचा मोदींवर पलटवार; आम्ही नरेंद्र मोदींना बंगालमधून रसगुल्ला देऊ

कोलकत्ता – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिलाडी अक्षय कुमारने खास मुलाखत घेतली. या मुलाखतीत नरेंद्र मोदींनी प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. यावेळी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि मोदी राजकारणात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असले तरीही त्यांचे संबंध सौहार्दपूर्ण असल्याचे सांगितले. आणि  ममता दीदी प्रत्येक वर्षी मला दोन कुर्ते आणि मिठाई पाठवितात, असेही मोदींनी सांगितले. यावर आता ममता बॅनर्जींनी पलटवार केला आहे. नरेंद्र मोदी हे अगोदर बंगाल मध्ये आले नाहीत आणि आता मात्र त्यांना बंगालमधून मतं हवी असल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हंटले आहे.

नरेंद्र मोदी यांनी अक्षय कुमारने घेतलेल्या मुलाखतीमध्ये ममता दीदी प्रत्येक वर्षी मला दोन कुर्ते आणि मिठाई पाठवितात, असे सांगितले होते. त्यानंतर ममता बॅनर्जींनी यावर प्रतिक्रिया देत, आम्ही त्यांना बंगालमधून रसगुल्ला देऊ, असे म्हणत माती पासून मिठाई बनवून त्यामध्ये दगडाचे खडे घालू, असे म्हंटले आहे.

https://twitter.com/ANI/status/1121722371415642112

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)