ममता दीदी मला दोन कुर्ते पाठवितात – मोदी  

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज खिलाडी अक्षय कुमारने खास मुलाखत घेतली. या मुलाखतीत नरेंद्र मोदींनी प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. यावेळी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि मोदी राजकारणात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असले तरीही त्यांचे संबंध सौहार्दपूर्ण असल्याचे मुलाखतीत सांगितले.

नरेंद्र मोदी म्हणाले कि,  ममता दीदी प्रत्येक वर्षी मला दोन कुर्ते पाठविते. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीनाजी मला ३-४ वेळा विशेषतः ढाकामधून मिठाई पाठवितात. ममता दीदींना कळले तेव्हा त्यांनीही वर्षातून एक-दोन वेळा मिठाई पाठविण्यास सुरुवात केली. काँग्रेस नेते गुलामनबी आझाद यांच्यासोबतही मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे त्यांनी सांगितले.

https://twitter.com/ani_digital/status/1120910614908612609

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)