ममता बनर्जी करत आहेत बांग्लादेशी घुसखोरांना वाचवण्याचा प्रयत्न- अमित शहा

कोलकाता: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी तृणमूल कांग्रेस आणि ममता बनर्जींवर टीकास्त्र सोडले. ममता बनर्जी बांग्लादेशी घुसखोरांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे शहा म्हणाले.

अमित शहा म्हणाले, तृणमूल कांग्रेसला राज्यातून हद्दपार करण्यासाठी बंगालमधील प्रत्येक जिल्ह्यात जाणार. आधी बंगाल मध्ये रविंद्र संगीत ऐकायला मिळत होते. आता मात्र स्फोट, धमाक्यांचे आवाज येतात. आमच्यासाठी देश प्रथम नंतर वोट बँक असल्याचे शहा म्हणाले.

-Ads-

दरम्यान, अमित शहा यांचे नेताजी सुभाषचंद्र बोस अंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यावर युवक काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवत विरोध दर्शवला. युवक काँग्रेसचे कार्यकर्ते काळे झेंडे दाखवून थांबले नाहीत तर त्यापुढे जाऊन त्यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधी घोषणाही दिल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)